टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी हा नव्या राजकीय समीकरणाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेली अनेक वर्षे पक्षनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारीचे बक्षीस मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र उमेदवारीच्या वाटपात मातंग समाजाला बाजूला ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने नाराजीचा सूर तीव्र झाला आहे.

मातंग समाजाचे नेते व भाजप निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे खंडू खंदारे यांना भाजपने उमेदवारी नाकारली, खंदारे यांच्या बिनविरोध होण्यासाठी पक्षातूनच विरोध झाला आयात उमेदवार लादल्याचा असल्याचा आरोप खंडू खंदारे यांनी केला आहे.

मागील अनेक वर्षापासून हातात पक्षाचा झेंडा आणि डोक्यात पक्षाचा अजेंडा घेऊन प्रामाणिक काम करणाऱ्या निष्ठावंतांना नगरपालिका निवडणुकीत उमेदवारीपासून डावलण्यात आल्याने तीव्र नाराजीचा सूर निर्माण झाला आहे.

आजपर्यंत या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी छतरंज्या उचलण्यापासून ते सभेत भाषण करण्यापर्यंत सर्व कामे केली आहेत. उमेदवारीचे बाशिंग बांधून निवडणुकीच्या भोवल्यावर बसण्याचा तयारीत असणाऱ्या निष्ठावंतांना पक्षाकडून डावलण्यात आले आहे.
त्यामुळे खंडू खंदारे यांच्यासह समाज देखील नाराज झाले खंदारे वेगळा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहेत.

याचाच परिणाम म्हणून नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाला धक्का बसेल की त्या निष्ठावंताच्या जागी देण्यात आलेल्या नव्या चेहऱ्याला फटका बसेल हे आतातरी सांगणे अवघड आहे, पण निष्ठावंताच्या नाराजीचा सूर कोणालातरी नक्की भोवणार ? हे मात्र निश्चित!

सध्या नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेकडून होत असल्याने, प्रत्येक मताचे मोल अधिक वाढले आहे. नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीचा परिणाम थेट नगरसेवक आणि नगराध्यक्ष या दोन्ही निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना समजावून घेण्याचे मोठे आव्हान आता सर्वच पक्षांसमोर उभे टाकले आहे.
कुठं घोड अडकलं?
पक्षश्रेष्ठीकडूनही माझ्या नावाची घोषणा करण्यात आली होती, परंतु कुठं घोड अडकलं की काय आम्हाला समजलं भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या सर्व नेत्यांनी माझी शिफारस केली होती. तरीदेखील मला उमेदवारी दिली नाही त्यामुळे मी आता समाजासोबत उभा राहणार आहे.-खंडू खंदारे, साठेनगर मंगळवेढा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











