मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर जिल्हा नियोजन समितीसाठी (डीपीसी) नगरपालिका, महापालिका तसेच जिल्हा परिषदेतून ४० सदस्यांची निवड एप्रिल महिन्यात करण्यात येणार आहे.
राज्य शासनाकडून आदेश प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले सदस्य मतदानाद्वारे या ४० सदस्यांची निवड करतील.

दरम्यान, महापालिकेतील स्वीकृत सदस्य, स्थायी समिती व परिवहन समितीच्या निवड प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या निवडीही लवकरच पार पडणार आहेत.

या सर्व प्रक्रियेनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्त्वाखाली डीपीसी सदस्यांची निवड होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ४० जागांसाठी निवडणूक होणार असून, महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेतील सदस्य आपापल्या संस्थांमधून प्रतिनिधी निवडतील. डीपीसीत स्थान मिळवण्यासाठी इच्छुक नगरसेवकांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.

५० सदस्यीय समिती तसेच १४ विशेष निमंत्रित
जिल्हा नियोजन समितीत एकूण ५० सदस्य असतात. विकासकामांना मंजुरी देणे व बैठकीत सूचना मांडणे, हे अधिकार या ५० सदस्यांना असणार आहे.

याशिवाय राज्य शासनाकडून नामनिर्देशित सदस्य, खासदार, आमदार, वैज्ञानिक विकास महामंडळाचा प्रतिनिधी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींचा समावेश असणार आहे. तसेच १४ विशेष निमंत्रित सदस्यांसह एकूण ६४ सदस्य समितीत सहभागी होणार आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













