टीम मंगळवेढा टाईम्स ।
दामाजी कारखान्याचा कारभार करताना प्रसंगी कठोर निर्णय घेऊ पण अडचणीतल्या दामाजीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दामाजी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाळवणी येथे सत्कार आयोजित करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात,संचालक रेवणसिद्ध लिगाडे, औदुंबर वाडदेकर,विष्णू चौगुले, दामाजी शिंदे, पांडुरंग चौगुले,पंडित माने, जालिंदर माने, दत्तात्रय गायकवाड,श्रीकांत निकम,ज्ञानेश्वर पाटील,धनाजी चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की कारखानदारी चालवण्यासाठी योग्य नियोजन लागते आहे ते नियोजन आम्ही मार्गदर्शकाच्या सहकार्याने करू
मागील कार्यकाळामध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळे पाच लाखापेक्षा अधिक गाळप होऊ शकले नाही त्यामुळे 198 कोटी कर्जाचा डोंगर उभा राहिला.
परंतु दिवंगत मंडळीचा आशीर्वाद पाठीशी घेऊन कारखान्याचा कारभार करताना प्रसंगी कठोर निर्णय घेऊ पण अडचणीतल्या दामाजीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू,
गेले काही वर्ष रिक्त असलेले कार्यकारी संचालकाचे पद नुकतेच भरले असून संस्था दुरुस्त होईपर्यंत कारखान्याची कोणती सेवा वापरणार नसल्याचा निर्णय आम्ही संचालक मंडळांनी घेतला.
संस्था सुरळीत होण्यासाठी जरा वेळ लागेल पण निश्चितच आम्हीही प्रयत्न करून त्यासाठी शेतकरी सभासदांनी देखील समजून घेतले पाहिजे तालुक्याच्या दक्षिण भागांमध्ये बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे.
पाण्याचा प्रश्न अगोदर मार्गी लावा
या योजनेचा प्रश्न मार्गी लागल्यास तालुक्यातील ऊस क्षेत्रात वाढ होऊन साखर कारखानदारी चांगली चालण्यासाठी मदत होणार आहे म्हणून त्यासाठी आ प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावून
हा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे तालुक्यातील एखादे विकासाचा प्रश्न मागे ठेवा, पण पाण्याचा प्रश्न अगोदर मार्गी लावा यासाठी आपण तगादा लावणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी तर आभार अण्णासाहेब आवळेकर यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज