मंगळवेढा टाईम्स न्युज : संपादक : समाधान फुगारे
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रचाराचा धुरळा उडाला आहे. नेते सध्या प्रचारात व्यग्र असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुती आमने-सामने असून आपली सत्ता यावा यासाठी मतदारांना आवाहन करत आहेत.
दरम्यान या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षण समर्थकांचा प्रभाव पडणार का? याची चिंता अनेक मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील उमेदवारांना आहे. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार नसलो तरी काही उमेदवारांना पाडणार असल्याचा इशाराही दिला आहे.
त्यामुळे मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार असल्याचे दिसत आहे.
भाजप उमेदवार समाधान आवताडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँग्रेसकडून भगीरथ भालके तर मनसे कडून दिलीप धोत्रे यांच्यात थेट लढत होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पॅटर्न चालला त्यामुळे महायुतीच्या जागा कमी निवडून आल्या. याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झालेला आहे.
मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघामध्ये मराठा समाजाचे मोठे मताधिक्य आहे. यामध्ये तिन्ही उमेदवार मराठा समाजाचे आहेत त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टरचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार याची चर्चा आता रंगू लागली आहे.
मात्र सध्या तरी त्यांनी सत्ताधारी पक्षांवरती रोष व्यक्त केला आहे त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाज काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षण समर्थकांचा प्रभाव तसाच राहिला तर भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तर मी समाजाच्या आरक्षणासाठी लढता लढता मरणार असं सांगत मनोज जरांगे यांनी सरकार कुणाचंही येवो त्यांच्यासमोर आमचं आव्हान असेल असं स्पष्ट केलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज