टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना आज मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ही प्रक्रिया मंगळवार, २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
२७ ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने या दिवशी निवडणूक कार्यालयास सुटी राहील. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना केवळ सात दिवस मिळणार आहेत. वाद्यांनाही अर्ज दाखल करताना बंदी घालण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व कार्यालयाबाहेर कापडी मंडपाची सोय आहे. कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह केवळ पाच जणांनाच निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश असणार आहे.
गर्दी करून कार्यालयात येणाऱ्यांना प्रवेश नसणार आहे, अशी माहिती शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे इच्छुक उमेदवार तसेच त्यांचे कार्यकर्ते सध्या निवडणूक कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. आवश्यक कागदपत्रे तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया या संदर्भात माहिती घेत आहेत.
डिपॉझिट रक्कम दहा हजार रुपये
एससी, एसटी उमेदवारांसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट रक्कम असणार आहे. तर इतरांसाठी दहा हजार रुपये डिपॉझिट रक्कम असणार आहे.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्याची एक प्रत निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी होणार आहे.
४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तसेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. २५ नोव्हेंबरला आचारसंहिता शिथिल होणार आहे
मीना श्रीमनलाल यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती
सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, अक्कलकोट तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी मीना श्रीमनलाल यांची खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्या थांबणार असून, निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने कोणालाही भेटायचे किंवा कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास सकाळी दहा ते अकरादरम्यान संबंधितांना भेटतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज