टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सात या वेळेपर्यंत मतदान होणार आहे.
यासाठी कोरोना रुग्ण,दिव्यांग , ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व अत्यावश्यक सेवेतील 3 हजार २५२ मतदारांनी टपाली मतदान केले आहे. मतदारसंघात दिव्यांग १७८५, ज्येष्ठ मतदार हे १३ हजार ६८९ आहेत.
टपाली मतदान केलेल्यांना शनिवारी मतदान केंद्रावर मतदान करता येईल , अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
या निवडणुकीत एकूण १९ उमेदवार असले तरी भाजपचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यातच खरा सामना होत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर सिध्देश्वर आवताडे,शैला गोडसे व सचिन शिंदे यांच्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, मतदारसंघात १ लाख ७८ हजार १९० पुरुष , १ लाख ६२ हजार ६९ ४ स्त्री व इतर ५ असे एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार आहेत एकूण ५२४ मतदान केंद्रे आहेत त्यात ३२८ मूळ मतदान केंद्र , १९६ सहाय्यक मतदान केंद्रे आहेत.
१६ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत . या प्रत्येक केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूक केली आहे. २५२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग व्यवस्था केली आहे. तसेच ३२६ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
कोरोनची लक्षणे असणाऱ्या मतदारास शेवटच्या एक तासामध्ये नियमांचे पालन करून मतदान करण्यास परवानगी दिली आहे. मतदानासाठी २ हजार ६२० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
सुरक्षेसाठी ५५० पोलिस अधिकारी , कर्मचारी , १००० आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे . १३१० राखीव कर्मचारी आहेत.
कर्मचाऱ्यांची काळजी
कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ९ ० हजार मास्क , ८ हजार ५०० फेस शिल्ड , ४८०० बॉटल सॅनिटायझर , ५५० पल्स ऑक्सिमीटर , सोडियम हायपोरेट २५०० लिटर मतदान केंद्रावर पुरविले आहेत. दोन मे रोजी सकाळी आठ वाजता येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज