मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना, आरक्षण झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाचे उपआयुक्त के.सुर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला.
17 जानेवारी 2023 आदेशान्वये राज्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला. या ग्रामपंचायतीची अंतीम प्रभाग रचना 25 एप्रिल रोजी राज्य निवडणुक आयोगाने आलेल्या हरकती विचारात घेऊन अंतीम केली.
या कार्यक्रमानुसार राज्यातील सुमारे २२८९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्याचे शासनाने २५ मे, २०२३ च्या पत्रान्वये कळविले आहे. आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार 16 जून, विशेष ग्रामसभेची सूचना देणे (आरक्षणाची सोडत काढण्याकरीता),
21 जून विशेष ग्रामसभा बोलवून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली, आरक्षणाची सोडत काढणे (अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला),
22जून सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करणे, 23 ते 30 जून प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे,
6 जुलै उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे,12 जुलै उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, 14 जुलै जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिध्दी देणे असा हा प्रभाग रचनेचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
त्यामुळे सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासक काम करीत असून, अनेक ठिकाणी प्रशासकामुळे कारभार करणे अडचणीचे ठरत आहे. कारण प्रशासक हे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी असल्यामुळे त्यांना तिथले कामकाज करून ग्रामपंचायतचा कारभार करताना नाकीनऊ येत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित केल्यामुळे अनेकांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होण्यासाठी लागलेले डोहाळे आता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे प्रभाग निश्चितीनंतर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
या ग्रामपंचायतीची होऊ शकते आरक्षण सोडत
आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी, खुपसंगी, रड्डे, खडकी, बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार, मानेवाडी, शिरसी, जंगलगी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, देगाव, उचेठाण, निंबोणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी, भाळवणी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज