मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सारथी संस्था आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापत चालले आहे. सारथी संस्थेबद्दल वक्तव्य केल्यामुळे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी ‘याबद्दल राजकारण करत माझ्यावर आरोप होत असेल तर मला यातून मुक्त करा’ अशी भूमिकाच मांडली आहे. The Chief Minister should free me from this, the agitation demanded by the Congress Minister Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar
‘सारथीची स्वायत्तता कुठेही संपलेली नाही. सारथीचं काम उत्तम पणे सुरू आहे. पत्रकार परिषद घेणारी भाजपचीच टोळकी आहेत,’ अशा आक्रमक शब्दांमध्ये विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.
तसंच, ‘सारथी संस्थेबाबत माझी भूमिका दुटप्पी आहे, असे आरोप केले जात आहे. पण मी सारथीबाबत कोणतीच नकारात्मक भूमिका घेतली नाही. मी ओबीसी समाजाचा नेता असल्यामुळे माझ्यावर हे आरोप केले जात आहे’ असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.
तसंच, ‘या संस्थेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न मी केला आहे. तरीही माझ्यावर असे आरोप होत असेल तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती करणार की, राजकारण करत माझ्यावर आरोप होत असेल तर मला यातून मुक्त करा त्या ऐवजी या पदाची जबाबदारी एखाद्या मराठा नेत्याला द्या’ असं स्पष्ट मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, ‘उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून क्रांती मोर्चाने दिला आहे.
‘राज्यातील 3 पक्षाच्या सर्कसमुळे मराठा समाजावर अन्याय व्हायची भीती आहे. ‘सारथी’बाबत एक समिती नेमली. त्यानंतर अहवाल आला. परत दुसरी समिती नेमली. मात्र हा अहवाला समोर मांडला जात नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून या खात्याचा कारभार काढून घ्यावा,’ अशी मागणीही या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
‘सारथीच्या प्रश्नावरून आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठवलं होतं. तेव्हा 15 दिवसांत प्रश्न मार्गी लावतो, असं सांगण्यात आलं मात्र 6 महिने उलटल्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. जर आरक्षणाबाबत दगा फटका झाला तर मराठा समाज आक्रोश करेल,’ असा इशारा यावेळी देण्यात आला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज