टीम मंगळवेढा टाईम्स ।
इंटरनॅशनल इनर व्हील थीम इंनरव्हील क्लब शाखा मंगळवेढा याच्या वतीने महिलांसाठी रक्त तपासणी करून थायरॉईड, हिमोग्लोबीन, रक्ताच्या पेशी आदी तपासण्या अल्पदरात करून प्रथमच तालुक्यामध्ये महिलासाठी उपक्रम राबवला गेला.
सदर आरोग्य शिबिरात अनेक महिलांनी रक्ताची चाचणी करून पुढील उपचार तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार असून महिलांना असणाऱ्या विविध आजाराची माहिती इनर व्हील क्लबच्या अध्यक्ष वीणा विंग ,सचिव सुनंदा आवताडे यांनी दिली.
तसेच यापुढे इनरव्हील क्लब मंगळवेढा यांच्या वतीने पुढील काळात सोनोग्राफी, कॅन्सर संबंधी कालकोस्कोपी, ममोग्राफी , रक्तदाब , मधुमेह ,हाडांची कॅल्शियम ,युरिक एसिड आदी विविध आजारासंबंधी महिलांची स्त्री आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेत.
सदर रक्त तपासणी शिबिरामध्ये महिला हॉस्पिटल लबोरोटरी संचालक दावल इनामदार व मेट्रोपॉलिस हेल्थ केअर लिमिटेड मुंबई यांच्या वतीने अल्प दरामध्ये तपासणी करून सहकार्य केले.
तरी तालुक्यातील महिलाना याचा लाभ मिळावा तसेच आर्थिक मदत म्हणून आम्ही विविध प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करणार आहोत. तसेच गरीब महिलांना विविध आजाराची जागरूकता करून विविध शिबिरे,उपक्रम यापुढेही या क्लब तर्फे राबवण्यात येणार आहे.
यावेळी इनरव्हील क्लब मंगळवेढ्याचे अध्यक्ष लीना वीग सेक्रेटरी सुनंदा आवताडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी माजी अध्यक्ष प्रफुल्लता स्वामी, महानंदा धुमाळे आदी इनरव्हील क्लबच्या सदस्यानी शिबिर आयोजित करून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
इनर व्हील क्लब शाखा मंगळवेढा यांच्या वतीने महिलांना सवलतीच्या दरात थायरॉईड , व्हिट्यामिन ,कॅल्शियम व इतर टेस्टच्या रक्त तपासणी करायची असेल तर लॅबोरेटरी टेकनालॉजिस्ट दावल इनामदार (मो. 9860960186) यांच्याशी संपर्क करून महिलांनी तपासणी करून घ्यावी.
यावेळी सुजाता स्वामी, सुधा मांडवे, सविता गडदे ,कुसुम मोरे ,हर्षा बारगजे, छाया क्षीरसागर आदी महिला उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज