टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथे दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाने महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती तहसिलदार मदन जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली.
दि.१ ऑगस्ट रोजी आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयात महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
यावेळी महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
दि.२ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमीत जागांचे पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम होणार आहे.
दि. ३ऑगस्ट रोजी पाणंद व शिव रस्त्यांची मोजणी करुन त्याच्या दुतर्फा झाडे लावणे. दि.४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडलनिहाय राबविण्यात येणार आहे.
दि.५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डी.बी.टी.न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी अनुदानचे वाटप करण्यात येईल. दि.६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशित करणे व ते अतिक्रमण मुक्त करुन शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे.
दि.७ ऑगस्ट रोजी एम. सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पुर्णात्वास नेणे व या कार्यक्रमाने महसूल सप्ताहाची सांगता होईल असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महसूल नायब तहसिलदार शुभांगी जाधव, महसूल सहाय्यक शिवाजी भोसले, कविता पुरी, सर्व विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी व अन्य कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज