टीम मंगळवेढा टाईम्स ।
सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक राजेंद्र फुगारे व त्यांची कन्या शिवांशी हिच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम मध्ये अन्नदान केले तसेच रक्तदान शिबीरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, समाजसेवक राम पाटील, गणेश दांडगे ,बंडू काटे, रमेश शिंदे, कवी गणेश गायकवाड, गोपाळ माळी ,अमृता पाटील, राजाभाऊ फुगारे मित्र परिवार तसेच सर्व फुगारे परिवार नेहरू युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
समाजसेवक, नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष
राजाभाऊ फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमाचे विठ्ठलचे संचालक सचिन भैय्या वाघाटे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.तर उद्घाटन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस प्रमोद साळुंखे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.
यावेळी प्रेरणा बीज भंडाराचे युवा उद्योजक सिद्धेश्वर दांडगे यांनी बोलताना म्हणाले की तरुणांनी रक्तदान करावे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा मोलाचा संदेश दिला.
राजाभाऊ नेहमी सामाजिक बांधिलकी जपतात वाढदिवसानिमित्त त्यांनी अशीच समाजसेवा करावी मोलाचा संदेश दिला.
ह भ प रवी महाराज काळे कीर्तनकार यांनी याप्रसंगी आशीर्वाद दिला.यावेळी त्यांनी राजभाऊ फुगारे समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करून देणारे व्यक्तिमत्व आहे असे संबोधित केले कारण त्यांना परमानार्थ्याची आवड व निस्वार्थ सेवा समाजसेवा करण्यास आवडते.
या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील उमेश खरबडे, सरपंच विजय सरतापे ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, गणेश दांडगे, विनोद दांडगे,कृष्णा लाटे अक्षय दांडगे,रियाज शेख आरोग्य सेवक,
संदीप शिखरे, बंधू संजय फुगारे, विजय फुगारे, कुमार माने, बाळू माने कार्यक्रमाप्रसंगी नेहरू युवामंडळाचे सर्व अधिक पदाधिकारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज