टीम मंगळवेढा टाईम्स ।
वैभव नागणे यांनी उद्योग व्यवसाय मोठी भरभराटी घेतली आहे, आता समाजाची सेवा करून राजकारणात यावे व त्यांनी मंगळवेढ्याचे नेतृत्व करावे असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केले आहे. वैभव नागणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, शिक्षक नेते संजय चेळेकर, उद्योजक आनंद पाटील, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, महादेव नागणे, हरीश गायकवाड, रमेश भांजे आदिजण उपस्थित होते.
जानकर पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत जात असताना वैभव नागणे यांना विचारून पवार साहेबांसोबत मी गेलो. भाजपने पाठवलेल्या विमानामधून मी उडी मारून पवार साहेबांची साथ दिली. यामध्ये वैभव नागणे यांची महत्त्वाची भूमिका आहे.
आजपर्यंत वैभव नागणे यांनी उद्योग व्यवसायामध्ये मोठी प्रगती केली आहे, त्याचबरोबर त्यांनीही आता राजकारणात यावे, राजकारणात येऊन त्यांनी समाजकारण करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
चंद्रशेखर कोंडूभैरी बोलताना म्हणाले की, मित्र परिवारातील प्रत्येकाची काळजी घेणारा वैभव नागणे यांनी उद्योग व्यवसाय सातासमुद्रापार नेला आहे. येणाऱ्या काळात नागणे यांनी राजकारण यावे यासाठी आम्ही आग्रही असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
सत्काराला उत्तर देताना वैभव नागणे म्हणाले की, माझ्या मित्र परिवाराच्या आग्रहामुळे मी वाढदिवस करत आहे, वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो, 50 वा वाढदिवस साजरा करत असताना, आजपर्यंत केलेले काम, सर्वानी दिलेले योगदान यांचा मी ऋणी आहे.
वाळू सारखा व्यवसाय करत असताना कुठेही गालबोट लागू दिले नाही, नवीन उद्योग करत असताना उद्योग व्यवसायाकडे मी वळालो, जगातील प्रत्येक इव्हेंटला हजर राहून भविष्यातील अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार काम सुरू केले.
राजकारण हा माझा पेशा नाही, उद्योग व्यवसायासाठी मी काहीही करायला तयार आहे तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.येणाऱ्या काळात मंगळवेढयामध्ये मोठा प्रकल्प सुरू करणार असून यासंदर्भात दुबई, कतार येथील उद्योजकांशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज