टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंतप्रधान योजनेतून तुम्हाला गृह उद्योगाकरिता एक लाख रुपये मिळवून देते, असे सांगून शहरातील ५०० ते ५५० महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कर्ज मिळवून देण्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक महिलेकडून साडेतीन हजार ते पाच हजार रुपये घेण्यात आले असून, आमिष दाखविणारी महिला आता गायब झाली आहे.
तळे हिप्परगा येथील ज्योती रमेश कांबळे (४०) हिच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शुभांगी गायकवाड (४२, कोर्णाक नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती.
आरोपी महिलेने शहरातील काही भागांमध्ये फिरून, पंतप्रधान योजनेंतर्गत बचत गटांमधील महिलांना गृहकर्ज दिले जात आहे ही सर्व प्रक्रिया मी राबविते त्यासाठी १०-१० महिलांचा गट करावा लागेल.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग होईल, त्यात तुमचे कर्ज मंजूर होईल अन् आवघ्या १५ दिवसांत तुमच्या खात्यावर एक लाख रुपये जमा होतील असे तळे हिप्परगा येथील महिला सांगत होती.
तिच्यावर विश्वास ठेवून शहरातील महिलांनी आपले गट तयार केले, त्यानुसार आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो व बँकेचे पासबुक झेरॉक्स महिलेकडे दिले. सर्व कागदपत्रे घेताना त्या महिलेने प्रत्येक महिलांकडून कामाचे पैसे म्हणून साडेपाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
शिवाय त्यातील तीन हजार रुपये कागदपत्रांसमवेत घेतले व उरलेली रक्कम कर्ज मिळाल्यानंतर देण्यास सांगितले.
महिलांचा त्या महिलेवर विश्वास बसला. महिलांनी सर्व कागदपत्रांसमवेत रोख रक्कम दिली. जानेवारी २०२४ पासून हा प्रकार सुरू होता मात्र ऑक्टोबर-२०२४ संपत आला तरी महिलांना पैसे मिळाले नाहीत.(स्रोत; लोकमत)
लखपती दीदी’ योजना समजून महिला फसल्या
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ‘लखपती दीदी’ योजनाच आहे की काय? असा समज करून महिलांनी अर्ज भरले. रोखीने पैसे दिले मात्र त्या महिलेने सर्वसामान्य, गरीब कष्टकरी महिलांची फसवणूक केली.
■ एक लाख रुपयाच्या कर्जापोटी महिन्याला फक्त एक हजार रुपयाचा हप्ता, २५ हजारांची सबसिडी, ७५ हजारांची फेडशिवाय गटातील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना वॉशिंग मशीन आणि घरगुती पिठाची चक्की भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महिलांचा आणखी विश्वास बसला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज