टीम मंगळवेढा टाईम्स।
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या शुब्दीकरणासाठी नमामी गंगेच्या धर्तीवर चंद्रभागा नदीचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकारात्मक आहेत.
चंद्रभागा स्वच्छतेचा आणि विकासाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा, आशा सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्या असल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने श्री.विठ्ठलाच्या दर्शनासाठी देश विदेशातून कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येत असतात.
श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक हे पवित्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात तीर्थ म्हणून नदीचे पाणी भाविक पितात. अलीकडच्या काळात चंद्रभागा प्रदूषित झाली आहे.
चंद्रभागा नदीच्या शुद्धिकरणासाठी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
भाजपचे सरकार असताना नमामी चंद्रभागा प्राधिकरण सुरू केले होते, मात्र नंतरच्या काळात त्यावर म्हणावे तसे काम झाले नाही.
त्यामुळे नमामी गंगे प्राधिकरणासारखे प्राधिकरण स्थापन करून चंद्रभागा नदी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
सादर मागणीची दाखल घेत केंद्रकडे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचा प्रस्ताव सादर करण्याचा सूचना राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत.
लवकरच चंद्रभागा शुध्दिकरणासाठी प्राधिकरण स्थापन करेल
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रभागा शुद्धीकरणाची इच्छा व्यक्त केली होती. ते त्यासाठी सकारात्मक आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे चंद्रभागा शुद्धिकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. नमामी गंगेच्या धर्तीवर केंद्र सरकार लवकरच चंद्रभागा शुध्दिकरणासाठी प्राधिकरण स्थापन करेल – आ.समाधान अवताडे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज