टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-सांगोला मार्गावर आणखी एक अपघात झाला असून भरधाव येणाऱ्या एका कारने दुचाकीस्वाराला धडक दिली आणि या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत.
पंढरपूर – सांगोला मार्ग रुंद आणि सिमेंटचा झाल्यापासून या मार्गावर अपघाताची मालिकाच सुरु झाली आहे. रस्ता चांगला झाला असल्यामुळे वाहने अत्यंत वेगाने धावत आहेत आणि यातून सतत अपघात होत आहेत.
गेल्या काही महिन्यात या मार्गावर अनेक अपघात झाले असून मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढते आहे. आता पुन्हा एकदा पंढरपूर ते खर्डी दरम्यान पठाण वस्ती येथे अपघाताची एक घटना घडली आहे.
पठाण वस्ती येथे राहणारे साठ वर्षे वयाचे लतीफ काशीम पठाण आणि मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील फिरोज मकबूल इनामदार हे दोघे दुचाकीवरून निघाले असता रस्त्यावरून वळू लागले असताना अपघात झाला.
सांगोल्याकडून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या मारुती सुझुकी कारने या दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवरील पठाण आणि इनामदार दोघेही जखमी झाले.
दोघानाही जोराचा मार लागला असून पंढरपूर तालुका पोलिसात जब्बार शेख यांनी फिर्याद दिली आहे. सोमर्डी, ता. जावळी (सातारा) येथील कारचालक सुरज प्रकाश परमाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज