टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावातील ढाब्याच्या पाठीमागे चालणार्या जुगार अड्डयावर बोराळे बीटच्या पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 20 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जुगार अड्डाचालकासह 12 जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, तांडोर येथे काका ढाब्याच्या पाठीमागे 52 पानाच्या पत्त्यावर पैशाचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी बोराळे बीटचे पोलिस हवालदार महेश कोळी,
पोलिस नाईक परमेश्वर दुधाळ,पोलिस नाईक सुनिल यादव,पोलिस शिपाई सोमनाथ माने,दत्तात्रय खराडे आदी पोलिसांचे पथक पाठवून जुगार अड्डयाची खात्री केली असता दि.12 रोजी 8.00 वा.
यातील आरोपी गिराप्पा आप्पा पुजारी (वय 43),काशिनाथ पाराप्पा पुजारी (वय 35),महासिध्द औदुंबर मळगे (वय 55) सर्व रा.तामदर्डी,बापूराव दत्तात्रय कोकरे(वय 32 रा.तांडोर),महेश हरीदास बेलभंडारे (वय 38 रा.पाकणी),
हरिश्चंद्र प्रकाश कुंभारे (वय 33 रा.पाकणी), महेश विठ्ठल कांबळे (वय 32 रा.वडापूर), दावल गनीसाब शेख (वय 19 रा.सिध्दापूर), सैफन रजाक शेख (वय 50 रा,सिध्दापूर), भागवत नागन्नाथ मळगे (वय 34,रा.तांडोर),
मदार अफसर शेख (वय 28,रा.तांडोर) क्लब चालक बापूराव दत्तात्रय कोकरे (वय 32 रा.तांडोर) आदी आरोपी सदर ठिकाणी गोलाकार बसून जुगार खेळत असल्याने
पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा 2 लाख 20 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने, सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.
दरम्यान, तालुक्यात चोरटी वाळू, अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज