टीम मंगळवेढा टाईम्स।
सिताराम महाराज साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांनी २०२१-२२ या वर्षी गाळपास घातलेल्या ऊसाला दिवाळी सणासाठी २०० रुपये खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती सिताराम महाराज साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी दिली.
खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याचा १२ वा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ .प .जयवंत महाराज बोधले यांच्या शुभहस्ते पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे होते.
श्री.सदगुरु सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी या साखर कारखानाचा १२ वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वा पार पडला.
याप्रसंगी प्रा शिवाजीराव काळुंगे बोलत होते. यावेळी सिताराम व धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे,
सांगोला तालुका शेतकरी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,
व्हाईस चेअरमन तानाजी खरात, सद्गुरु साखर कारखान्याचे राजेवाडी चे चेअरमन एन शेषगिरी, चार्टर्ड अकाउंटंट सदानंद हजारे, जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन राजेंद्र हजारे,
उद्धव बागल, प्रा. मारुती जाधव . डॉ रविराज गायकवाड. ॲड.दिपाली पाटील. अभिजीत मुदगुल .पांडुरंग गोरे सर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, सुयोग गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ पार पडला.
पुढे बोलताना प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये साडेपाच लाख मे.टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट असून दहा मेगावॅट सहविजनिर्मिती प्रकल्पातून तीन कोटी युनिट वीज एक्सपोर्ट केली जाणार असून पुढील वर्षी कारखाने मध्ये शेतकऱ्यांना जास्त दर देण्यासाठी प्रकल्प ची उभारणी करणार आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना उसाच्या बिलाची रक्कम तोडणी वाहतूक कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर पूर्ण केला असून त्यांच्या विश्वासात कारखाना पात्र असल्याचे सांगितले.
कारखान्यातील कामगारांची दिवाळी गोड होण्यासाठी १५ दिवसाचा बोनस खात्यात जमा केला आहे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला विविध गटातील ऊस उत्पादक शेतकरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे विधीवत पुजन करुन गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ
करण्यात आला.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी गायकवाड यांनी गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये साडेपाच लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट असुन १० मेगा वॅट सहवीज निर्मिती प्रकल्पातून तीन कोटी युनिट वीज एक्सपोर्ट होईल.
तसेच पुढील वर्षी कारखान्यावर डिस्टीलरीचा प्रकल्पही उभा करून सुरू करणार आहोत. सिताराम कारखान्याने वेळेत शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम, तोडणी वाहतूक रक्कम आणि कर्मचा-यांना दरमहा पगार अदा करून ऊस पुरवठा शेतकरी, कर्मचारी व तोडणी वहातुक कंत्राटदार यांच्या विश्वासास पात्र ठरला आहोत.
यावेळी ह.भ.प जयवंत महाराज बोधले, मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, संचालक समाधान काळे, प्रा. माऊली जाधव, नानासाहेब लिगाडे, शेषगिरी राव यांनी आपले विचार व्यक्त करून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास याप्रसंगी सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे संचालक मोहन बागल, प्रगतशील बागायतदार बिभीषण ताड, सिद्धेश्वर गंगथडे, , मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक राहुल सावंजी, माजी जि प सदस्य शिवाजीराव नागणे, दत्तात्रय भाकरे, दामाजी शुगरचे माजी संचालक पांडुरंग भाकरे,
दामाजी शुगरचे संचालक दिगंबर भाकरे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप फडतरे, संभाजी घुले, धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत,
धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे चंद्रकांत वेदपाठक, सिध्दनाथ जगदाळे, शिवाजी घोडके, दत्तात्रय सावंत, धुळा पाटील, चांगदेव पवार तसेच धनश्री महिला पतसंस्थेतील व धनश्री मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी, कारखान्यातील सर्व विभागाचे कर्मचारी तसेच पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला या भागातील उस पुरवठा शेतकरी सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ रणदिवे व राजेंद्रकुमार जाधव यांनी केले तर आभार जनरल मॅनेजर हनमंत पाटील यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज