टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी आज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदाच्या २७ जागेसाठी ७२ तर सदस्यपदाच्या २४७ जागांसाठी ५४४ इतके अर्ज शिल्लक राहिले आहेत. ब्रह्मपुरी व हिवरगाव ही दोन गावे बिनविरोध झाली असून सदस्याच्या २७ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
ब्रम्हपुरी सरपंच पदासाठी स्नेहलता संजय पाटील तर ग्रामपंचायत सदस्य भवन सविता मधुकर कोकरे, राजेंद्र शामराव पाटील, संदीप दिनकर पाटील, अश्विनी तुकाराम पुजारी, रोशनी राजेंद्र कोकरे,
बाळासाहेब केराप्पा सोनवले, हौसाबाई विलास पाराध्ये, श्वेता मनोज चव्हाण, अमोल नागनाथ देशमुख, सिंधू महादेव चव्हाण रणजीत अशोक पाटील तसेच हिवरगाव ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार कमल रविकांत खांडेकर या बिनविरोध झाल्या तर मुक्ताबाई बुरंगे, पूजा दत्तात्रय उपाडे, महादेव वसंत वाघमोडे, शशिकांत निवृत्ती खांडेकर, पारूबाई विलास वाघमोडे, अश्विनी शहाजी लवटे या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
ब्रम्हपुरी येथे आ. आवताडे व माजी आ. परिचारक गटाच्या दामाजीच्या दोन आजी माजी संचालकांनी एकत्रित येत गाव बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. तसेच हिवरगाव येथे आ. समाधान आवताडे गटाचे समर्थक माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी देखील गाव बिनविरोध केले असून त्यांचे बंधू माजी सरपंच रवी खांडेकर यांच्या पत्नी कमल खांडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
लक्ष्मी दहिवडी येथे प्रभाग दोन मधे सीमा प्रशांत पाटील, योजना सिध्देश्वर सोनवले तसेच प्रभाग पाच मधे गौरी महेश स्वामी, प्राजक्ता दादासो गायकवाड, मनोहर सदाशिव लिगाडे तसेच खडकी येथील जयश्री छनुलाल रजपूत या बिनविरोध झाल्या आहेत. नंदुर ग्रामपंचायतमध्ये वैशाली मल्लाप्पा होनमाने या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
मंगळवेढा तहसील कार्यालयात अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदाच्या २७ जागेसाठी १७६ तर सदस्यपदाच्या २४७ जागांसाठी ९५४ अर्ज दाखल झाले होते. सरपंच पदाचे १०५ तर सदस्यपदाचे ४२९ जणांनी अर्ज माघारी घेतले.
नूतन निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचा आ.समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला.
आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी गावनिहाय शिल्लक राहीलेले :
शिरसी – सदस्य १९ सरपंच २, आंधळगाव – सदस्य २७ सरपंच ४, खडकी सदस्य १९ सरपंच २, अकोले – सदस्य २० सरपंच ४, जंगलगी जागा सदस्य १४ सरपंच २, खुपसंगी सदस्य २४ सरपंच २, जुनोनी – सदस्य – २१ सरपंच ५, महमदाबाद हुसदस्य ४१ सरपंच ४, बठाण सदस्य १८ सरपंच ४, शेलेवाडी – सदस्य १४ सरपंच २, उचेठाण- सदस्य १८ सरपंच ४, ब्रम्हपुरी – सदस्य ११ सरपंच १, निंबोणी- सदस्य २४ सरपंच २, जालीहाळ- सदस्य १८ सरपंच २,
मुंढेवाडी सदस्य १५ सरपंच २, भाळवणी- सदस्य १८ सरपंच ४, चिक्कलगी- सदस्य १९ सरपंच २, नंदूर- सदस्य २६ सरपंच ४, हिवरगाव- सदस्य ८ सरपंच १, रड्डे – सदस्य ४२ सरपंच ४, लक्ष्मीदहीवडी – सदस्य २४ सरपंच ४,
लोणार- सदस्य १८ सरपंच ४, मानेवाडी- सदस्य १८ सरपंच २, पडोळकरवाडी- सदस्य १९ सरपंच ४, रेवेवाडी- सदस्य १८ सरपंच २, देगांव- सदस्य १४ सरपंच २, डीकसळ – सदस्य ११ सरपंच ४, लमाणतांडा १ जागेसाठी ४ अर्ज राहिले आहेत (पोटनिवडणूक ).
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज