टीम मंगळवेढा टाईम्स ।
बनावट मृत्युपत्र तयार करून उमासा नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यातील दोन कोटी दहा लाख 68 हजार रुपयांची रक्कम परस्पर आपल्या खात्यात वर्ग करून घेतल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर महादेव बागदुरे (वय 51, रा. नरेंद्र नगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजशेखर महादेव बागदुरे, राजश्री राजशेखर बागदुरे, राकेश उर्फ सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे (सर्व रा. अक्षय सोसायटी, जुळे सोलापूर),
शारदा विजयकुमार बागदुरे, दीपक राजेंद्र माशाळ (रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर), जगदीश सुधाकर जाधव (रा. मसरे गल्ली, महालक्ष्मी दुध डेअरी शेजारी, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर बागदुरे व राजशेखर बागदुरे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. चंद्रशेखर बागदुरे यांचे वडील महादेव बागदुरे यांचे निधन झाले आहे.
रविवार पेठेत असलेल्या उमासा नागरी सहकारी पतसंस्थेतील खाते क्रमांक 793 मध्ये चंद्रशेखर यांचे वडिल महादेव बागदुरे यांच्या नावावर दोन कोटी दहा लाख 68 हजार रुपये होते.
महादेव बागदुरे यांनी तयार केलेल्या मृत्यू पत्राचे बनावट मृत्युपत्र तयार करून राजशेखर बागदुरे व त्यांच्या इतर साथीदारांनी डिसेंबर 2018 मध्ये बनावट मृत्युपत्र तयार करून ते पतसंस्थेत सादर करून वडिलांच्या नावे असलेल्या खात्यातील दोन कोटी दहा लाख 68 हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली.
ही बाब चंद्रकांत बागदुरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक गायतोंडे पुढील तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज