टीम मंगळवेढा टाईम्स।
अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला. मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं.
हा प्रकार अनावधानाने झाल्याचं आव्हाड यांनी सांगितल्यानंतरही भाजपने हा मुद्दा लावून धरला आहे. भाजपने आव्हाड यांच्या विरोधात उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइंही उद्या आंदोलन करून आव्हाड यांचा निषेध नोंदवणार आहे. तसेच आव्हाड यांच्या विरोधात या प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहर भाजपकडून ही तक्रार करण्यात आली होती. तर आव्हाड यांच्या विरोधात रायगडमध्ये दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
रायगडमध्य जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. या आदेशाचं आव्हाड यांनी उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 188 आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि 22 कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे पोलीस फिर्यादी झाले आहेत.(स्रोत:TV9 मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज