टीम मंगळवेढा टाईम्स ।
नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर आणि ज्युनिअर मुले-मुली सेपक टकरा स्पर्धेत इंग्लिश स्कूल मंगळवेढा या प्रशालेच्या समरजीत कदम, भक्ती नागणे व भक्ती घुले या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली सोलापूर संघाने विजेतेपद पटकावले.
सोलापूर जिल्ह्याच्या संघामध्ये इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेच्या खेळाडूंची निवड झाली होती.
या स्पर्धेत सबजूनियर मुलांच्या संघाचे कर्णधार पद समरजीत सुजित कदम याच्याकडे होते.
त्याच्या नेतृत्वाखाली सोलापूर संघाने नागपूर, परभणी, पुणे, जळगाव संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली व अंतिम सामन्यात नागपूर संघाचा पराभव करत विजेते पदाला गवसणी घातली.
तसेच मुलींच्या संघाचे कर्णधार पद भक्ती प्रभाकर नागणे हिच्याकडे होते. तिच्या नेतृत्वाखाली नाशिक, परभणी, पुणे संघाचा पराभव करत विजेतेपद मिळविले. जुनिअर मुलींच्या संघाचे कर्णधार पद भक्ती दिगंबर घुले हिच्याकडे होते तिच्या नेतृत्वाखाली सोलापूर संघाने नागपूर, पुणे आणि अंतिम सामन्यात अमरावती संघाचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.
ज्युनिअर मुलांच्या संघाचे कर्णधार पद संकेत विठ्ठल बिले याच्याकडे होते राज्यस्तरीय स्पर्धे त उत्तम खेळ करत या संघाने सहभाग नोंदविला. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत त्यांनी गटात विजेतेपद पटकावित तिहेरी मुकुट संपादन केला.
यामध्ये मुलांच्या इंग्लिश स्कूल मंगळवेढ्याचे विजेते खेळाडू खालील प्रमाणे आहेत.
सबज्युनिअर संघातील खेळाडू समरजीत सुजित कदम, (कर्णधार), अथर्व दिगंबर तोडकरी, गणेश आगतराव बिले, श्रीराज सतीश सावंत, ओंकार राजेंद्र कदम, प्रज्वल अमित जगदाळे, संस्कार माणिक गुंगे, विश्वजीत लक्ष्मण वाघ, आरुष विजय गवळी, विराज अतुल मुरडे.
सबज्युनिअर मुलींच्या संघातील खेळाडूः भक्ती प्रभाकर नागणे (कर्णधार), वैष्णवी लक्ष्मण वाघ, सई प्रकाश कोळी, पूर्वी बाळासाहेब जाधव, अर्पिता अविनाश पावले, ओवी प्रकाश कोळी, जान्हवी गणपत लेंडवे, वैष्णवी तानाजी जाधव.
जूनियर मुलींच्या संघातील खेळाडू भक्ती दिगंबर घुले (कर्णधार), प्रणिती प्रभाकर नागणे, नम्रता नानासो सुळकुंडे, आनंदी शिवाजी हेंबाडे या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेतील क्रीडा शिक्षक आण्णा विठ्ठल वाकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संचालिका डॉ. मिनाक्षी कदम, सचिवा डॉ. प्रियदर्शनी कदम-महाडिक, संचालिका तथा इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले,
संचालिका अजिता भोसले, खजिनदार रामचंद्र नेहरवे, संचालक यतिराज वाकळे, ड. शिवाजी पाटील, सोलापूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत, सचिव रामचंद्र दत्तू, इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक सुहास माने, सतीश सावंत, लता ओमणे, अशपाक काझी, पालक, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज