टीम मंगळवेढा टाईम्स ।
जिल्हा परिषद शाळेत घटणाऱ्या पटसंख्येमुळे वर्ग रिकामे पडताना दिसत आहेत. अशा स्थितीत केवळ तीन पटसंख्या असलेल्या शाळेत शिक्षकांनी प्रयत्न करून आठ दिवसात २३ पर्यंत पटसंख्या वाढवली.
शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करून वाडी-वस्तीवरील शाळाबाह्य मुले शाळेत आणली. मंगळवेढा तालुक्यातील ठेंगील वस्ती (मुढवी) या शाळेत पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले.
याबाबत माहिती अशी, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्रत्येक शाळेला चालू शैक्षणिक वर्षात १० टक्के पट वाढवण्याचे आव्हान केले होते.
हेच आव्हान स्वीकारून ठेंगील वस्ती शाळेत नव्याने नियुक्त झालेले नागेश धनवे व कृष्णदेव भुसे या दोन शिक्षकांनी प्रयत्न करून शाळेचा पट तीनवरून २३ वर नेला आहे.
या कार्यासाठी मुढवीचे तानाजी खरात, सरपंच महावीर ठेंगील यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनातून पालक, ग्रामस्थांचेचे समुपदेशन केले.
मनोरंजनाच्या खेळातून अभ्यास, त्यामुळे संख्या वाढली
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. वृक्षारोपण, दिंडी, रोज शाळेत येणाऱ्यास बक्षीस, इंग्रजी वाचन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची आणि वर्गात बसण्याची गोडी लागल्याचे शिक्षक नागेश धनवे यांनी सांगितले.
विश्वास संपादन करून मुलांना शाळेत पाठवण्यास सांगितले
शाळेचा पट कमी असल्यामुळे सुरुवातीला खूप अडचणी वाटत होत्या. लोकांचा विश्वास संपादन केला. त्यातून मुलांना शाळेत पाठवण्यास सांगितले. मुलांची प्रगती पाहून पालक समाधानी आहेत. पट वाढल्याचा आम्हाला आनंद आहे. कृष्णदेव भुसे, शिक्षक जि. प. शाळा, ठेगील वस्ती
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज