मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 6 जुलैचा दिवस काही राशींसाठी फार शुभ असणार आहे. उद्या आषाढी एकादशीचा देखील दिवस असल्या कारणाने उद्याचा दिवस फार खास आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.
मेष रास
मेष राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, विवाहितांसाठी उद्याचा दिवस फार चांगला असणार आहे. आषाढी एकादशी असल्या कारणाने तुमच्यावर विठोबाची कृपा असेल.
मिथुन रास
मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस खास असणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. काही खास लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी देखील करु शकता.
कर्क रास
कर्क राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असेल. या दिवशी तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल, जोडीदाराबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल.
तूळ रास
तूळ राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तसेच, पैशांशी संबंधित तुमच्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील. नवीन वस्तूंची खरेदी तुम्ही करु शकाल. विवाहितांसाठी हा काळ चांगला असेल.
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. तुमचा सकारात्मक दृष्टीकोन असेल. तसेच, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही करु शकाल. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. तुमचा मानसिक तणाव कमी होईल. लव्ह लाईफ चांगली असेल.(स्रोत:abp माझा)
(टीप : वरील सर्व बाबी मंगळवेढा टाइम्स केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज