टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील हॉटेल सुगरणच्या समोर उभा केलेल्या टँकरची २० हजार रुपये किमतीचे
दोन टायर डिस्कसहीत चोरून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी विजय घोडके ( रा . बोराळे ) हे दि .१६ रोजी रात्री १.०० वा.
मंगळवेढा येथील हॉटेल सुगरणच्या समोर एम एच १३ , सी.यु.९ १६ ९ हा टँकर उभा करून ते बोराळे येथे गावी गेले होते.

यावेळी अज्ञात चोरटयाने २० हजार रुपये किमतीचे दोन डिस्कसहीत अपोलो कंपनीचे टायर चोरून नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














