मंगळवेढा टाईम्स न्युज।
बार्शी तालुक्यातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे ७३ वर्षीय सासरे सर्जेराव शंकरराव नायकुडे यांनी मंगळवार, १० मार्च रोजी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची

घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. सुनेच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी मयत सर्जेराव नायकुडे यांचा मुलगा महेश नायकुडे (वय ४१, रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाऊ उमेश याची पत्नी सारिका उमेश नायकुडे (रा. कुडुवाडी रोड, बार्शी) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सर्जेराव नायकुडे (वय ७३) आणि फिर्यादी मुलगा हे बार्शीतील नाईकवाडी प्लॉट येथील स्वतःच्या बंगल्यात राहत होते.

तर फिर्यादी महेश नायकुडे याचा भाऊ उमेश व त्याची पत्नी सारिका उमेश नायकुडे (रा. कुईवाडी रोड, बार्शी) येथे काही महिन्यापासून राहत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सासरे सर्जेराव हे त्यांच्याकडे राहत असताना त्यांची सून सारिका ही किरकोळ कारणावरून सतत अपमानित करून मानसिक त्रास देत होती. त्यामुळे सर्जेराव नायकुडे हे मानसिक तणावाखाली होते.

अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी नाईकवाडी प्लॉट बार्शी येथे घरी आले आणि १० मार्च २०२६ रोजी सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवली. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माकणे करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










