टीम मंगळवेढा टाईम्स ।
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्य सरकारकूडन अनेक मोठे निर्णय घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांत राज्याने मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेतले आहेत.
दरम्यान, मुस्लीम मतांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यातील सर्व मदरशांमधील शिक्षकांचा पगार थेट तिप्पट केला आहे. राज्यभरातील मदराशांतील शिक्षकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांच्या पगारात वाढ करावी, असा ठराव मांडण्यात आला. हा ठराव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र सरकारने मान्य केला.
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. असे असताना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला महत्त्व आले आहे. मुस्लीम मतांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.
राज्य सरकारने नेमका काय निर्णय घेतला?
राज्य सरकारने मदरशातील शिक्षकांचा पगार वाढवला आहे. सोबतच मौलाना आझाद मायनॉरिटी फायनॅन्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतही वाढ केली आहे. हा निधी अगोदर 700 कोटी रुपये होता. आता तो 1000 कोटी रुपये करण्यात आला आहे.
शिक्षकांच्या पगारात किती वाढ झाली?
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मदरशातील शिक्षकांच्या पगारात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. अगोदर DEd पर्यंत शिक्षण झालेल्या शिक्षकांना प्रतिमहिना 6000 रुपये पगार होता. आता नव्या निर्णयानुसार हा पगार 16000 हजार रुपये करण्यात आला आहे.
तसेच माध्यमिक स्तरावर शिकविणाऱ्या शिकक्षांचा पगार अगोदर प्रतिमहिना 8000 रुपये होता. आता हाच पगार 18000 रुपये करण्यात आला आहे. मदरशांतील शिक्षकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज