टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढतच आहे. सोमवारी एकाच दिवसात शहरातील विविध भागात नव्याने १० रुग्ण आढळून आले आहेत.
उत्तर सदर बझार येथील एका तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ ने मृत्यू झाला. गेल्या आठवड्यातील हा तिसरा बळी ठरला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण देखील वाढले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.
या रुग्णांमधून ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक संशयित रुग्णांची चाचणी घेण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मंगळवारच्या अहवालात मंगळवेढा व पंढरपूरात नव्याने प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळुन आले आहेत. तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्या 10 वर पोहचली आहे.
सोमवारी दिवसभरात ११९ संशयितांच्या आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये ५ पुरुष आणि ५ महिला असे १० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये भावनाऋषी आरोग्य केंद्र-५, मजरेवाडी- २ आणि बाळे, दाराशा, सोरेगाव याठिकाणी प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.
शहरात गेल्या १७ दिवसात तब्बल ६८ कोरोना रुग्ण आढळून आल्याची नोंदही महापालिकेच्या
आरोग्य विभागाकडे झाली आहे. शहरात आतापर्यंत ३४ हजार ६०३ रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी आढळून आलेल्या रुग्णांमधील ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या शहरात १४ पुरुष, १९ महिला असे ३३ रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांना त्यांच्या घरातच विलगीकरण करून उपचार करण्यात येत आहेत.
लष्कर परिसरातील उत्तर सदर बाजार येथे राहणारा एका ३० वर्षीय तरुणाची प्रकृती खालावल्याने त्यास २० मार्च रोजी पहाटे १:४५ वाजता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. कोरोनाने आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या १ हजार ५१९ इतकी झाली आहे.
राज्य शासनाच्या गाईडलाईनुसार महापालिका प्रशासन काम करीत आहे. दुसरी लाट नंतर सध्याची लाट म्हणता येत नाही. शहरात जे कोरोना पॉझिट रुग्ण आढळत आहेत.
संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. सध्या रुग्णांची संख्या कमी आहे, असे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले.
आता ७ दिवस क्वारंटाईन
यापूर्वी कोरोनासंदर्भातील रुग्णांना दहा दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र आता शासनाच्या आदेशानुसार ७ दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज