टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे घराच्या पटांगणात रात्रीच्यावेळी हँंडल लॉक करून लावलेली 25 हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल
हंँडल लॉक तोडून चोरटयांनी पळवून नेण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी लिंगेश्वर गवळी (रा.भालेवाडी) यांनी दि.4 रोजी रात्री 10.00 वा. हिरो होंडा कंपनीची 25 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटर सायकल एम एच 13,डी.के.5986 ही घरासमोरील मोकळया अंगणात हँडल लॉक करून लावली होती.
दि.5 च्या पहाटे 5.00 वा. यातील फिर्यादी जागे झालेनंतर उठून घराबाहेर आले असता घरासमोर लावलेली मोटर सायकल दिसून आली नाही.
सदर मोटर सायकलचा परिसरात सर्वत्र शोध घेतला.ती मिळून न आल्याने अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज