मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावातील सत्पुरुष सिंहगड महाराज मंदिरात रविवारी सकाळी चोरीचा थरार उडाला.
मंदिरातील लोखंडी दानपेटी फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणारा इसम रंगेहात पकडला असून, त्याच्याकडून रोख ₹1,730 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
फिर्यादी दत्तात्रय पांडुरंग गायकवाड (वय 75, रा. मरवडे) यांनी मंगळवेढा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मंदिरात दररोज सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत दर्शनासाठी व्यवस्था असते.
आज सकाळी सुमारे ८.४० वाजता गावातील भारत गणपती घुले यांनी फोनवरून माहिती दिली की मंदिरात एक व्यक्ती दानपेटी फोडत आहे.
तत्काळ ते घटनास्थळी पोहोचले असता, आनंदा दगडू बनसोडे यांनी त्या इसमाला पकडून ठेवले होते.
बनसोडे यांनी सांगितले की, दर्शनासाठी आले असता एक अनोळखी इसम कटावणीने दानपेटी फोडून पैशांचा गठ्ठा आपल्या बनियनमध्ये लपवत होता.
त्याला पकडून पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान, पोलिस पाटील महेश रंगनाथ पवार यांनी पोलीसांना माहिती दिल्यानंतर मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अटक केलेल्या व्यक्तीचे नाव समीर शेखलाल मुजावर (वय 32, रा. तेग्गेहळळी, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) असे असून त्याच्याकडून ₹1,730 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज