टीम मंगळवेढा टाईम्स।
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यात हिंगोली, वर्धा, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तर अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
विदर्भात कमाल तापमान चाळिशीच्या खाली आले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार आहे.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे.
दिल्लीतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये 9 एप्रिलपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज