टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात चोरांनी अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून २४ तासात तब्बल तीन ठिकाणी चोरट्यांनी आपले लक्ष केंद्रीत करून हजारोंचा मुदेमाल लंपास केल्याने नागरिकांतून भीतीचे वातावणर पसरले आहे.
लक्ष्मी दहिवडी येथे १ डिसेंबर रोजी रात्रौ १.०० च्या सुमारास नितीन मधुकर बनसोडे हे शेतात पाणी धरण्यासाठी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या घरात जावून कपाटात ठेवलेले कानातील टॉप्स , अंगठी , मणीमंगळसुत्र या सोन्याच्या दागिन्यासोबत ११ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याची फिर्याद नितीन बनसोडे यांनी मंगळवेढा पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद केला असून अधिक तपास हवालदार पवार हे करीत आहेत.
तर डोणज लक्ष्मी शिवानंद जाधव यांचे जयबजरंग बली नावाचे किराणा व शिलाई कामाचे दुकान असून ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्रौ ११.३० ते १ डिसेंबर रोजी पहाटे ५.०० च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यामध्ये ठेवलेले ३० हजार रुपये फिर्यादीच्या संमतीवाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेले.
अशी फिर्याद लक्ष्मी जाधव यांनी दिली . पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना.चव्हाण हे करीत आहेत.
तसेच ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजणेपुर्वी मरवडे येथे बँक ऑफ इंडिया शाखेचे असलेले एटीएम मशिन अज्ञात चोरटयाने कोणत्या तरी लोखंडी पट्ठीने चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम लॉकमध्ये लोखंडी पट्टी घालून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत मशिनचे नुकसान केले आहे.
अशी फिर्याद रवी इंजामुरी यांनी पोलिसात नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द भा.दं. वि.सं.कलम ३८०,५११,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय राऊत हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज