मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण म्हणत पत्नीला चाबकाने मारहाण करून तिचा छळ केला. या जाचाला कंटाळून काजल नारायण मिस्कीन (वय २५, रा. दहिवली, ता. माढा) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.
सासरी काजलला खूप त्रास देण्यात येत होता. तिला उपाशी पोटी ठेवत होते. तिला कोणाशीही बोलू देत नव्हते. यामुळेच तिने आत्महत्या केली. यामुळे आरोपींवर कारवाई करण्याची मागणी काजलच्या माहेरच्या मंडळींनी केली.
याप्रकरणी गुरुवारी रात्री पती नारायण विलास मिस्किन, विलास रामचंद्र मिस्किन, शोभा विलास मिस्किन (रा. दहीवली, माढा) यांच्यावर टेंभूर्णी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काल गुरुवारी सकाळी काजलने आत्महत्या केल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली असता फौजदा-अजित मोरे, संतोष पाटेकर हे आदी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह टेंभुर्णीच्या आरोग्य केंद्रात दाखल केल असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सोलापुरातील सिव्हिलमध्ये आणला.
दोन महिन्यांपूर्वीच गेली होती सासरी
काजलचा नारायणसोबत ११ जुलै २०१९ मध्ये विवाह झाला होता. सासरच्या मंडळींकडून पैशासाठी त्रास होत असल्याने २०२४ मध्ये तिने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ती जवळपास एक वर्ष माहेरी राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिच्या पतीने तिचा छळ करणार नाही,
चांगले नांदविणार, कोणताही त्रास देणार नाही, असे कोर्टात लिहून दिले होते. यानंतर ती जून महिन्यातच पुन्हा सासरी गेली होती. त्यानंतरही तिचा छळ सुरूच होता, असा आरोपी तिच्या माहेरच्या मंडळींनी केला
शरीरावर मारहाणीचे व्रण
काजलला गार पाण्यानेच अंघोळ करण्यास भाग पाडायचे. माहेरच्या नातेवाइकांशी बोलू दिले जात नव्हते. मोबाइलवरून आई-वडिलांना सासरी व्यवस्थित असल्याचे सांगायला भाग पाडत असे. रक्षाबंधनासाठी तिला माहेरी पाठविण्यात आले नव्हते, असा आरोप केला.
घटनेनंतर काजलच्या गळ्यावर आणि सर्वांगावर मारहाणीच्या खुणा असल्याचा आरोपही यावेळी नातेवाइकांनी केला. तिच्या पश्चात चार वर्षाची एक मुलगी असल्याची माहिती मयत काजलचे नातेवाईक रूपाली रणदिवे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज