मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
जात, धर्म लपवून ठेवून, प्रेमसंबंध तयार करून लग्नासाठी चर्चा करणारा प्रेमवीर अखेर नातेपुते पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदला आहे.
नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी मुलीच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन चौकशी करून कारवाई केली. मात्र या घटनेने खळबळ माजली आहे.

पुण्यातील खासगी कंपनीत काम करणारी नातेपुते येथील युवती (वय २५) ही पुण्यातील एका कंपनीत काम करणारा दक्ष केशव वैद्य (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, सध्या राहणार बाणेर, पाषाण लिंक रोड, पुणे) असे नाव धारण करून

आधार कार्ड व पॅन कार्ड बनवून पुण्यात वावरणारा आणि स्वतःला ब्राह्मण भासवणारा प्रत्यक्षात इक्बाल शेख (रा. टाकळीमिया, ता. राहुरी) असे असणारा तरुण याने सप्टेंबर २०२५ पासून संबंधित मुलीशी ओळख वाढवून मैत्री केली.

त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात केले. मुलीच्या आई-वडिलांशी आणि आत्याशी बोलणे चालू ठेवले. ‘मी ब्राह्मण आहे. कोरोनाकाळात माझे आई-वडील वारलेले आहेत.

माझा भाऊ आकाश केशव वैद्य हा नोकरीनिमित्त मुंबईत राहतो. गावी सहा एकर बागायती शेती, स्वतःचे घर आहे,’ असे सांगून लग्न करण्याचा लकडा लावला होता.

यादरम्यान मुलीच्या आईला पुण्यातूनच आरोपीच्या पत्नीचा चार-पाच वेळा फोन आले व तिने फोनवर वस्तुस्थिती सांगितली.
या प्रकरणाचा भांडाफोड होताच पोलिसांची चक्रे वेगाने फिरली. मुलीचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी काही दिवस कुटुंबीयांनी सहन केले.

यानंतर नातेपुते पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी विशाल वायकर यांना सर्व कुटुंब जाऊन भेटले. पोलिस खात्याने त्याला १० मार्च रोजी ताब्यात घेतले. ११ तारखेस पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












