टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा आता खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठा आता पूर्वीप्रमाणे फुलून गेल्या आहेत. त्यातच आता तळीरामांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
राज्यात आयात करणाऱ्या दारूवर स्कॉच विस्की उत्पादन शुल्क तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्यात आला आहे. राज्य सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयात करण्यात आलेल्या स्कॉचवरील उत्पादन शुल्क 50 टक्के कमी केले आहे. या निर्णयामुळे इतर राज्यात असलेल्या दारूच्या किंमती राज्यातली किंमती एक समान असणार आहे.
टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असता एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क हे उत्पादन खर्चातून कमी करण्यात आले आहे.
300 रुपये असलेला खर्च तो 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. गुरुवारी याबद्दल अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
राज्यात अनेक प्रकारचे मद्य हे आयात होत असतात. स्कॉच प्रकारच्या दारूतून राज्याला मोठा महसूल मिळतो.
राज्य सरकारला स्कॉचच्या विक्रीतून वर्षाला 100 कोटींचा महसूल मिळत असतो. या कपातीतून आता राज्याच्या महसुलामध्ये वाढ होणार आहे.
राज्याचा महसूल आता 250 कोटी रुपये वार्षिक होण्याची अपेक्षा आहे. किंमत कमी झाल्यामुळे बाटल्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे.
एक लाख बाटल्यांच्या विक्रीचे प्रमाण आता 2.5 लाखांपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
किंमती जास्त असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात बनावट दारूच्या विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे या विक्रीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे दारु तस्करीला आळा बसणार आहे.
उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे राज्यात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किंमतीत कमी झाल्यामुळे त्याची विक्री वाढणार आहे, त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे.
सध्या राज्यात दिवसाला १ लाख बाटल्यांची विक्री होत असते आता याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्यामुळे आता तळीरामांना स्कॉच ही स्वस्तात मस्त मिळणार आहे.(स्रोत:News 18 लोकमत)
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली., अधिका-याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली.
आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो.
या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
बनावट दारूच्या विक्रीला आळा बसणार
शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे.
उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्यात. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल.
सध्या एका दिवसात 1 लाख बाटल्या विकल्या जातात, शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहोचू शकते.
सर्वाधिक महसूल दारूमधून येतो
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो. महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या दरात कपात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे व्हिस्कीच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत आयात स्कॉच मिळू शकणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज