टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्याच्या टोकाला असलेल्या सिद्धापूर या गावात ज्येष्ठ नेते बापूराव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक गजानन पाटील सर यांच्या अथक प्रयत्नाने आर.बी.सी(RBC) इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज या संस्थेचे लावलेले रोपटे नक्कीच गुणवत्तेचा उच्चांक गाठून महाराष्ट्रात नावलौकिक वाढवेल.
लोकप्रतिनिधी म्हणून या संस्थेतील शारीरिक, बौद्धिक अशा प्रगतीमय विकास कामासाठी सदैव सोबत असल्याचे सांगून कर्तव्य निष्ठेने
शिक्षण सेवेची जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांचे मनोबल वाढवीणारे गौरवउद्गार आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना व्यक्त केले.
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील श्री.स्वामी विवेकानंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे झालेल्या मंगळवेढा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तांडोर-सिद्धापूरच्या RBC इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
याच अनुषंगाने आमदार समाधान आवताडे साहेब यांनी शाळेला भेट देऊन विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले.
आमदार आवताडे बोलताना पुढे म्हणाले, आर बी सी इंग्लिश मीडियम स्कूल ही संस्था नव्याने उभारलेली असून संस्थेची दिवसेंदिवस होणारी प्रगती, गुणवत्तेचा चढता आलेख, याशिवाय विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळ, जनरल नॉलेज तसेच बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या परिश्रमाला शाबासकीची थाप दिली.
संस्थेचे संस्थापक गजानन पाटील सर यांच्या पराकष्टातून उभारलेली संस्था देखण्या रूपाचं पांघरून घातली आहे. नक्कीच अल्पावधीत या संस्थेच्या वटवृक्षाची सावली राज्यभर नव्हे तर देशभर पसरेल असा विश्वास शेवटी बोलताना व्यक्त केले.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात आणि १९ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून दोन्ही संघ तालुका विजेते ठरले असून दोन्ही संघांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच, १४,मुली १७ आणि १९ वर्षाखालील मुलांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
याबद्दल सर्व खेळाडूंशी व त्यांच्या क्रीडा शिक्षकांशी आपुलकीने संवाद साधून मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराया चौगुले सावकार, माजी सभापती प्रदीप खांडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजीव बाबर माजी संचालक राजन पाटील, संत दामाजी शुगर संचालक औदुंबर वाडदेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर काकणकी, उपसरपंच सचिन चौगुले,
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मनगोंड दयानंद कोळी संस्थापक गजानन पाटील सर सचिवा मीनाक्षी पाटील प्राचार्य प्रियांका पाटील उपप्राचार्य प्रिया धनवे सुपरवायझर माधुरी कोरे आदी मान्यवर सहकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज