टीम मंगळवेढा टाईम्स ।
वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एक अभियंता महिला अंथरुणाला खिळून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभियंता महिलेच्या ३६ वर्षीय पतीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डॉ. प्रशांत यादव (रा. गुरुग्राम, हरियाणा), डॉ. स्वप्निल नागे (रा. नन्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची पत्नी खराडीतील एका कंपनीत क्वालिटी इंजिनिअर म्हणून काम करत होती. त्यांचे वजन जास्त असल्याने त्यांनी वजन कमी करण्याबाबतची माहिती घेतली होती.
त्या वेळी त्यांना एरंडवणे भागातील डिझायर क्लिनिकची माहिती मिळाली. महिलेने रुग्णालयात संपर्क साधला. त्या वेळी रुग्णालयातील स्वागत कक्षातील कर्मचाऱ्यांनी लिपोसक्शन शस्त्रक्रियेद्वारे वजन कमी करता येत असल्याचे संबंधित महिलेला सांगितले.
तीन महिन्यांच्या उपचारानंतर फरक नाहीच साडेचार लिटर मेद काढले
१६ ऑक्टोबर २०२२ रोजी अभियंता महिलेवर लिपोसक्शन शस्त्रक्रिया करून साडेचार लिटर मेद (फॅट) काढण्यात आले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर अभियंता महिला अत्यवस्थ झाल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शस्त्रक्रिया करताना भूल दिल्यानंतर नाडीचे ठोके (पल्स रेट), रक्तदाब कमी झाला तसेच प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने मेंदूला इजा पोहोचली
फक्त डोळ्यांची उघडझाप, बोलणे बंद
खासगी रुग्णालयात अभियंता महिला तीन महिने उपचार घेत होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी नेण्यात आले. तेव्हापासून पत्नी अंथरुणाला खिळून असून ती बोलत नाही. ती फक्त डोळे उघडझाप करत असल्याचे पतीने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले असून तपास सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज