
टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारानिमित्त फिरत असताना जनतेने अपार प्रेम दिल्याची कृतज्ञता शिवशंभो परिवाराच्या प्रमुख प्रा. तेजस्विनी कदम यांनी व्यक्त केली आहे.

कदम म्हणाल्या, महाराष्ट्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर सर्वांच्या नजरा सोडतीवर लागलेल्या होत्या यामध्ये नगराध्यक्ष पदाची सोडत मंगळवेढा नगरपरिषदेकरता सर्वसाधारण महिलेकरता आरक्षित झाली.
त्यानंतर सौ. तेजस्विनी सुजित कदम या नावाची चर्चा जोर धरू लागली. वेगवेगळ्या प्रभागातून नागरिकांचे फोन यायला लागले. मनामध्ये विचार होताच त्याला लोकांमुळे वाऱ्याचा वेग आला.

वर्तमानपत्रे मीडिया डिजिटल मीडियाने उमेदवारी उचलून धरली. सामान्य लोकांना याबद्दलची अधिक उत्सुकता लागली. हा हा म्हणता लोकांच्या उंबरठ्यापर्यंत आणि मनापर्यंत वहिनी पोहोचल्या. निवडणुकीच्या उमेदवारीने वातावरण तापू लागले. सक्षम कर्तव्यदक्ष कार्यक्षम उमेदवार मिळणार याबद्दल जनतेला समाधान वाटायला लागले. प्रत्येक विद्यार्थी पालक आमच्या मॅडम.. अशा आपुलकीच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमची लढाईची इच्छा होती. संपूर्ण महाडीक कुटुंबीय भाजप पक्षात खासदार, आमदार, महापौर अशा मोठमोठ्या पदावर आपली सेवा देत आहेत आमच्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अडचणीच्या काळामध्ये खूप मदत पक्षाने केली आहे.

राजकारणातून समाजकारण सामान्यांच्या संसाराला हातभार
म्हणून पक्षाने उमेदवारी दिली तर लढायचं अन्यथा पक्ष कार्यात आपण काम करायचं हे निश्चित. पण मला राजकारणाची खूप आवड असल्याने लहानपणापासून राजकारण जवळून पाहिले आहे. राजकारणातून समाजकारण सामान्यांच्या संसाराला हातभार या भावनेतून निवडणुकीच्या रिंगणात मी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला.

जनतेचा प्रतिसाद खूप मिळाला
प्रचाराचा शुभारंभ केला. होम टू होम कॉर्नर सभा भेटीगाठी यामुळे लोक प्रतिसाद खूप मिळाला संस्थेच्या शैक्षणिक कामाच्या माध्यमातून बालरंग भूमी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांस्कृतिक माध्यमातून शिवशंभो प्रतिष्ठान शिवशंभो महिला पतसंस्था बचत गट दत्तक योजना दांडिया गरबा या माध्यमातून मी सर्वांच्या सेवेसाठी तत्पर होतेच.

लोकांना बदल हवा होता नवा चेहरा हवा होता
निवडणूक ही माझ्यासाठी संधी होती संधीच सोनं मला जनतेसाठी करायचं होतं उमेदवारीचा चढ-उतार मी रोज जवळून पाहत होते पक्षाचा सर्वे, मीडिया सर्वे यात मी पुढेच होते लोकांना बदल हवा होता नवा चेहरा हवा होता मंगळवेढा शहराचा विकास हा माझा ध्यास होता

लोकांनी माझ्या उमेदवारीवर खूप प्रेम केले
अश्ववेगाने माझी प्रचार यंत्रणा चालू होती मैत्रिणी सहकारी जीवाचं रान करून लोकांपर्यंत पोहोचले सर्वांच्या तोंडी माझं नाव होतं प्रभाग एक ते दहा एक उंबरा असं नाही जिथे आम्ही पोहोचलो नाही नवे मतदार तर आमचे प्रचारक होते लोकांनी माझ्या उमेदवारीवर खूप प्रेम केले यांनाच तिकीट मिळायला पाहिजे असा सामान्यांचा आग्रह.

मी निराश झाले नाही
शेवटी प्रयत्न करणं हे आपल्या हाती असते. दि.१७ नोव्हेंबर २०२५ ला शेवटच्या दिवशी पक्षाने दुसरा उमेदवार जाहीर केला मी निराश झाले नाही नाराज तर नाहीच नाही पण माझ्या सहकाऱ्यांना खूप वाईट वाटले तेव्हा मीच म्हणाले परमेश्वराने आपल्याला सेवेसाठी दुसरी संधी राखून ठेवली असेल असो निवडणूक या येतच असतात
इथून पुढे तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याकरिता मी तुमच्यासोबत
पण प्रत्येक गोष्टीकडे फायदा तोट्याच्या नजरेतून पाहणे गैर यातून मला जनतेने खूप प्रेम दिले इथून पुढे तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याकरिता मी तुमच्यासोबत असेन तुमचा आवाज बनून माझी काम करण्याची इच्छा आहे

मी जे काही बोलले होते तो प्रत्येक शब्द खरा करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील
तुम्ही माझ्याकडून ज्या सेवेच्या अपेक्षा ठेवल्या होत्या माझ्या प्रचारात मी जे काही बोलले होते तो प्रत्येक शब्द खरा करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, तुमचं माझं नातं समाजसेवेच्या माध्यमातून दृढ होत राहील तुमच्या अपार ऋणात राहणं मी पसंद करेन. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल वेळेबद्दल ज्ञात अज्ञात अनेकांनी पाठबळ दिले असे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











