टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावात दारू पिवून शिवीगाळ करणार्याला तु कोणास शिव्या देतो याचा जाब विचारल्याने 53 वर्षीय इसमाच्या तोंडावर ठोसा मारून
दात पाडून गंभीर जखमी केल्याप्रकरणी भिमाशंकर उर्फ उसक्या गणपती कोळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी शिवाप्पा कपले हे दि.8 रोजी दुपारी 1.30 वा.तांडोर गावच्या हद्दीतील सोमलिंग मंदिराजवळील कट्टयावर फिर्यादी व त्याचा मित्र कल्लाप्पा म्हेत्रे (रा.सिध्दापूर) हे गप्पा मारीत बसले होते.
यावेळी वरील आरोपीने दारू पिवून मोठमोठयाने शिवीगाळ करीत असताना फिर्यादीने तु कोणास शिवीगाळ करतो असे विचारले असता
आरोपीने तुला काय करायचे आहे असे म्हणून शिवीगाळ करीत गच्चीला धरून हाताने मारहाण केली.
यावेळी मित्र कल्लाप्पा म्हेत्रे याने भांडणे सोडवा सोडवी केली. तदनंतर फिर्यादी पायी चालत सिध्दापूर प्राथमिक शाळेजवळ जात असताना
आरोपीने मोटर सायकलवर येवून फिर्यादीच्या तोंडावर हाताने ठोसा मारून तोंडातील वरचा एक दात पाडून जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज