टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर येथील शेळगी परिसरातील शिक्षक दांम्पत्यांच्या घरी दीड वर्षांपासून काम करणाऱ्या महिलेनेच (गुणाबाई तुकाराम जाधव) दागिने चोरी केल्याचे समोर आले आहे.
यापूर्वीही तिने चार हजार रुपयांची रोकड चोरी केली होती. मात्र, पती- पत्नी दोघेही शिक्षक असल्याने त्यांनी तक्रार केली नव्हती. 20 जानेवारीला दोघेही तळमजल्यावर बसले होते आणि ती महिला वरच्या मजल्यावर काम करीत होती.
तरीही आपण चोरी केले नसल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे गीता कवलगिकर यांनी जेलरोड पोलिसांत धाव घेतली होती.
यापूर्वीही केली होती चार हजारांची चोरी
बाहेरील लोकांकडून काही रक्कम उसनवारी तर काही रक्कम व्याजाने काढली होती.कमी पगारावर काम करीत असल्याने मुद्दल फेडणे अशक्य झाले होते.
मुलीच्या लग्नातील कर्जाचा बोजा कमी होईल म्हणून मालकिणीच्या घरातील गंठण चोरल्याची कबुली गुणाबाई तुकाराम जाधव (वय 36, रा. विरशैव नगर, शेळगी) हिने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. भालचिम यांनी बोलताना दिली.
शेळगी येथील लेंगरे परिसरातील बिराजदार शाळेजवळील गीता विरेश कवलगिकर यांच्या घरातून पाच तोळ्याचे गंठण चोरीला गेले. त्यानंतर त्यांनी जोडभावी पोलिसांत धाव घेतली आणि दीड लाखांचे सोन्याचे गंठण चोरीस गेल्याची फिर्याद नोंदविली. 20 जानेवारीला गीता व त्यांचे पती दोघेही सायंकाळी पाच वाजता गणपती दर्शनासाठी जाणार होते.
त्यावेळी त्यांनी कपाट उघडले आणि पाहिले, तर त्यात गंठण नसल्याचे दिसून आले. त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलेस विचारले, परंतु तिने आपण घेतले नसल्याचे सांगितले. त्यानंतर कवलगिकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. पवार, पोलिस हवालदार श्री. थोरात यांनी तपास केला.
सुरवातीपासूनच घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय असल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी गुणाबाई जाधव हिने पोलिसांना कबुली दिली असून चोरलेले दागिने परत केले आहेत, असेही श्री. भालचिम यांनी सांगितले.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज