टीम मंगळवेढा टाईम्स।
अल्पवयीन मुलाने गाडी चालविल्याबद्दल वळसंग पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवार, दि .३ मे २०२२ रोजी घडली.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद भागवत गायकवाड (वय ३०,रा. वळसंग पोलीस ठाणे ) यांनी दिलेल्या
फिर्यादीनुसार सुरेश वीरपक्ष स्वामी (वय ४६,रा.वळसंग, ता.द.सोलापूर, सध्या एमआयडीसी, चिंचोली, मोहोळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार, दि .३ मे २०२२ रोजी चार वाजता वळसंग ते दिंडूर जाणारे रोडवर अल्पवयीन मुलाने
मोटारसायकल क्रमांक एमएच १३ डीव्ही ४३३६ ही वय नसताना व वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक रस्त्यावर
मानवी व स्वतःच्या जीवितास धोका होऊन दुखापत होईल हे माहीत असताना चालविताना पोलिसांना आढळून आला.
पोलिसांनी त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जमादार हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज