टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून यामुळं हिवाळा सुरु असला तरी थंडी गायब झाली आहे.
सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढा, अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर सोलापुर, पंढरपूर, सांगोला, मोहोळ या तालुक्यांमध्ये पुढील दोन दिवसात विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
उलट लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून जोरदार पावसानंही विविध भागांमध्ये हजेरी लावली आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची स्थिती काय राहिल य़ाबाबत हवामान विभागानं माहिती दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील जत, खानापुर, कवठे महंकाळ, आटपाडी, तासगांव, वाळवा, पलुस, मिरज या भागांत २१-२२ तारखेला विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, बोरी, नारायणगांव, कळंब या भागात २१-२२ तारखेला विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
साताऱ्यातील फलटण, खटाव, पाटण, महाबळेशवर या भागात २१-२२ नोव्हेंबर रोजी विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
तर नाशिक जिल्ह्यातील सटाणा, चांदवड, कळवण, येवला, निफाड, लासलगांव, सिन्नर, दिंडोरी या भागात २१-२२ तारखेला विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज