टीम मंगळवेढा टाईम्स ।
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आज १४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना झालेल्या शाळेत २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
२५ टक्के आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांची कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
सोडत झाल्यानंतर लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातात. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवले आहे.
त्या पालकाकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्याव्यात, अशा सूचना शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत.
अशी असणार पडताळणी समिती
अध्यक्ष – गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, सदस्य- केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, पालक संस्थाचे प्रतिनिधी,
शिक्षकांचे प्रतिनिधी, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, सदस्य सचिव शिक्षण विस्तार अधिकारी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज