टीम मंगळवेढा टाईम्स।
काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विजयाचे गणित मांडून ठेवले आहे. मोहोळ, पंढरपूर, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतांच्या जोरावर आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय होईल, असा आडाखा काँग्रेस नेत्यांनी मांडला आहे.
शहर उत्तर, अक्कलकोट आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातील मतांच्या जोरावर आमदार राम सातपुते विजयी होतील, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.
सोलापूर लोकसभेसाठी एकूण ५९.१९ टक्के मतदान झाले. ४ जूनला निकाल आहे. या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
सर्वाधिक मतदान मोहोळ विधानसभा मतदारसंघात ६३.१५ टक्के झाले. भाजप, काँग्रेस या दोन्ही पक्षांचे निवडणूक प्रमुख, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून निकालाचा कल जाणून घेतला
इथे भाजपची मदार
पंढरपूर, मोहोळ मतदारसंघात भाजप मागे राहील, असा भाजप नेत्यांचाही अंदाज आहे. परंतु, शहर उत्तरमधून सातपुतेंना ४५ हजार, अक्कलकोटमधून २० हजार, शहर मध्यमधून १० हजाराचे मताधिक्य मिळेल,
या मतांच्या जोरावरच सातपुते किमान ५० हजाराने निवडून येतील, असे नेते सांगतात. सोलापूर दक्षिणचा शहरी भाग भाजपच्या बाजूनेच राहील. शहर मध्यबाबत काँग्रेसने केलेला ३० हजार मताधिक्याचा दावा फोल राहील यावर सर्व भाजप नेत्यांचे एकमत आहे.
काँग्रेसला इथे आशा
काँग्रेस नेत्यांच्या मते, आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ मतदारसंघातून ३० हजार, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून सुमारे २५ हजार, शहर मध्यमधून ३० हजार आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातून १५ हजाराचे मताधिक्य मिळेल, शहर उत्तर, अक्कलकोट मतदारसंघात काँग्रेस मागे राहील असा नेत्यांचा अंदाज आहे.
या नेत्यांच्या मते, शहर उत्तरमध्ये भाजपला ३० हजार, अक्कलकोटमध्ये १० हजाराचे मताधिक्य मिळेल. काही नेते सोलापूर दक्षिण मतदारसंघाच्या शहरी भागात काँग्रेसला अपेक्षित मताधिक्य मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त करतात. परंतु, हे सर्व नेते आमदार शिंदे किमान ५० हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील, असे सांगतात.(स्रोत;लोकमत)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास
लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास आहे. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची कामे झाली. आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून सोलापूर आणखी पुढे जाईल यावरही लोकांचा विश्वास बसला. लोकांनी उत्साहाने मतदान केले. येणार ते सातपुतेच.- आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष, भाजप.
भाजपचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले
भाजपचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले ही गोष्ट निवडणुकीत महत्त्वाची ठरली. बेरोजगारी, शेतकऱ्यांची नाराजी, आरक्षणाच्या निर्णयातील फसवेगिरीमुळे मतदार नाराज होते. लोकांचा रोष मतपेटीतून स्पष्ट दिसेल.- चेतन नरोटे, शहराध्यक्ष, काँग्रेस.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज