टीम मंगळवेढा टाईम्स ।
पत्नीने पतीस आपण गावात खोली भाडयाने घेवून राहू असे म्हणाले असता पतीने चिडून लोखंडी फुकारीने पत्नीस मारून खांडोळी करून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी अनिल एकनाथ बोदाडे (रा.मंगळवेढा)याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी जखमी पत्नी पार्वती अनिल बोदाडे(वय 35) यांना पती तथा आरोपी घरगुती कारणावरून नेहमीच मारहाण करीत असे.
मात्र फिर्यादीने याबाबत कुठेही तक्रार केली नव्हती. घरातील लोकांनी व नातेवाईकांनी बसून आपापसात वाद मिटविला होता.
मात्र दि.9 रोजी आरोपी रात्री मेटकरी वस्तीवरील शेतातील राहते घरी असताना रात्री उशीरा येवून त्यांनी जेवण केले.
व फिर्यादीस गावातून शेतात यायला त्रास होतो काय असे म्हणाल्याने फिर्यादी पती यास तुम्हाला यायला त्रास होत असेल तर
आपण गावात खोली भाडयाने घेवून राहू असे म्हणताच पतीने चिडून मारहाण करण्यास सुरुवात केल्यावर पत्नीने मला मारू नका असे म्हणत
असताना पडलेली लोखंडी फुकारी घेवून फुकारीने डाव्या हाताच्या दंडावर दोन्ही मांडयावर मारले तसेच छातीवर हाताने मारून तुइया खांडोळया करून टाकेन अशी धमकी देवून शिवीगाळ केली.
रात्रभर त्रास झाल्याने सकाळी घडलेली हकिकत भावाला फोनवरून सांगितल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवालदार पठाण यांनी याची फिर्याद दाखल करून अधिक तपासासाठी अन्य पोलिसांकडे वर्ग केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज