mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आई-बापाचा कहर! पैशासाठी बारावीतील लेकीच्या अब्रूशी खेळ; सहापेक्षा जास्त नराधमांसोबत अत्याचार करायला भाग पाडलं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 22, 2023
in क्राईम, राज्य
आई-बापाचा कहर! पैशासाठी बारावीतील लेकीच्या अब्रूशी खेळ; सहापेक्षा जास्त नराधमांसोबत अत्याचार करायला भाग पाडलं

टीम मंगळवेढा टाईम्स ।

इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय स्वतःच्याच मुलीला आई वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार भंडाऱ्यात घडला आहे.

पीडितेच्या काकीनं आरोपाची तक्रार पोलिसात केल्यानंतर हा घृणास्पद आणि खळबळजनक प्रकार समोर आला. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पीडितेच्या काकीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिल आणि अन्य एका महिलेसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. तर, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडिता ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. या प्रकारांमुळे भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

संजय (50) (वडील), मीनाक्षी (40) (आई), बादल महेन्द्र सुखदेवे (32) रा. सराटी ता. साकोली, विनोद रामदास चरडे (45) रा. आठवा मैल बौध विहारचे बाजुला नागपुर ह.मु. व्दारका नगर तिलकसिंग वार्ड गोंदिया जि. गोंदिया, पप्पु भगवान फुल्लुके (42) रा. तलाव वार्ड साकोली, वैशाली मनसाराम लंजे (30) रा. तलाव वार्ड, साकोली असे अटक करण्यात आलेल्या सहा जणांचे नाव आहे.

तर, अविनाश बांते या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. पीडिता ही साकोली येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे.

गावावरून रोज येण्याजण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोली येथील काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र, कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला नेले.

बऱ्याच दिवसापासून पीडीतेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने 14 डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबीयांची चौकशी केली. यावेळी पीडीतेने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. याप्रकरणी काकू ने पुढाकार घेत पीडीतेला साकोली पोलीस ठाण्यात आली याची तक्रार नोंदवली.

पैशासाठी पोटच्या मुलीला आई आणि वडिलांनीच ओळखीतल्या काही इसमांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली. हा प्रकार वाढत गेलेले महिन्याभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरीत्या अत्याचार करण्यात आले.

कधी पिढीच्या गावातील घरीच आई-वडिलांना समक्ष तर कधी साकोली तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडीतेवर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी पिढीतेच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली असून यातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.

त्या माध्यमातून त्यांनी पैसे कमवण्याचा प्रकार केला आहे. स्वतःच्या मुलीला बळजबरीने विकून शारीरिक अत्याचार घडवून आणण्याचा हा गंभीर प्रकरण समोर आल्याने त्याची चौकशी केली असता त्यात सात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यातील आई-वडिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली असून सातवा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे, अशी महिती भंडारा दिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितलं.(स्रोत:ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
Next Post
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

दोन दिवसात निर्णय द्या, देव आडवा आला तरी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा