टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहरातील औषध प्रशासनाने कारवाईचा फास आवळत शहर आणि ग्रामीन भागातील 15 मेडिकल स्टोअरवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
ग्रामीण भागातील तीन मेडिकल स्टोअरवर बनावट अँटी बायोटिक विक्री करताना कारवाई केली आहे.
यामुळे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील मेडिकल दुकाने तपासणी करून बनावट औषधे विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती सहायक ड्रग आयुक्त धनंजय जाधव आणि ड्रग इन्स्पेक्टर सचिन कांबळे यांनी दिली.

सोलापुरमधील नातेपुते भागात झिफी एफडीसी कंपनीचे बनावट अँटीबायोटिक औषध सापडले अँटीबायोटिक औषधची लॅब टेस्ट केली असता, त्यामध्ये अँटीबायोटिक नसून शुगर आणि डायक्लो निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
औषध क्षेत्रात एफडीसी कंपनीच मोठे जाळे असून औषध प्रतिनिधी देखीक काम करताना दिसतात. एफडीसी कंपनीचे वेगवेगळे औषध बाजारात उपलब्ध आहे.
मात्र, एका नागरिकाच्या सतर्कतेने नातेपुते येथे एका मेडिकल दुकानात एफडीसी कंपनीचे बनावट औषध विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
यानंतर गुप्त माहितीच्या आधारे औषध कार्यालयाने कारवाई केली आणि झिफी -२०० मिलीग्राम नावाचा औषध तपासणीसाठी जप्त केले. त्याची लॅब टेस्ट केली असता त्यामध्ये अँटीबायोटिकच उपलब्ध नव्हते.
एका बॉक्समधील औषधामध्ये शुगर आणि एकात डायक्लो असे कंटेंट प्राप्त झालं. लॅब टेस्टनंतर अधिक तपास करून नातेपुते अकलूज येथील तीन मेडिकल स्टोअरवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागातील अनेक मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्टच लायसन्स भाड्याने घेऊन, दुसरीच व्यक्ती मेडिकल स्टोअर चालवत होते.
त्यांची तपासणी करून त्यांचे परवाबे निलंबित करण्यात आले आहेत. एप्रिल २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत एकूण ४० दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये औषधांवरील तारीख संपणे, औषध खरेदीनंतर बिल न देणे, स्केड्युल्ड यादीमधील औषध डॉक्टरांच्या चिट्टीविना विक्री करणे अशा त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.(स्रोत;My महानगर)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज