टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रत्येक जोडप्याला वाटते की, आपल्याला स्वतःचे एकतरी मुल असावे पण काही जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला मुल होण्यासाठी मंगळवेढा तालुक्याचे सुपुत्र डॉ.दत्तात्रय पाटील व श्री.चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामतीचे डॉ.आशिष जळक यांनी एक संधी उपलब्ध करुन दिली आहे.
श्री.चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, बारामती, मंगळवेढा मध्ये दुसऱ्यांदा टेस्ट ट्यूब बेबी साठी मोफत सल्ला आणि मार्गदर्शन मोफत वंध्यत्व निवारण शिबिर आज रविवार दि.12 मे रोजी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत पंढरपूर रोडवरील वीरशैव मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आले आहे.
दांपत्याने जोडीने या शिबिरास यावे असे आवाहन डॉ.दत्तात्रय पाटील यांनी केले आहे. या शिबिरात मोफत समुपदेशन करण्यात येणार असून व तद्नंतर सेंटरला भेट दिल्या नंतर सोनोग्राफी तसेच धातूची तपासणी निशुल्क करण्यात येणार आहे.
नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा
यासाठी आपण 8484861900 या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.
https://www.facebook.com/share/6LG1aoPhkiQUY1CU/?mibextid=WC7FNe
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील शंभरहून अधिक जोडप्यांना श्री.चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या माध्यमातून अपत्य प्राप्ती झाली असुन यामध्ये २०-२५ वर्षे लग्नहोऊन देखील अपत्य नसलेल्या अनेक लोकाना अपत्यप्राप्ती देण्यात यश डॉ.दत्तात्रय पाटील यांना आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व नावाजलेले सेंटर म्हणून ओळख असलेले श्री.चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे मागील 5 वर्षांपासून अवितरीत सेवा देत आहे.
जोडप्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी गर्भधारणा, पाळीच्या तक्रारी, टेस्ट ट्यूब बेबी बद्दल माहिती, गर्भाशयाच्या गाठी PCOS आणि इतर गर्भाशयाचे आजार त्यामुळे मूल होण्यासाठी अडचणी निर्माण होतात गर्भधारणेच्या संदर्भात सर्व चाचण्या व उपचार आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती डॉ.दत्तात्रय पाटील देणार आहेत.
वंध्यत्व आणि उपचार
गेल्या दोन दशकांमध्ये वंध्यत्वाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. जोडप्याला लग्नानंतर एक वर्षानंतर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता शरीरसंबंध केल्यानंतरसुध्दा गर्भधारणा होत नसेल, तर त्या जोडप्यास वंध्यत्व आहे असे म्हणू शकतो.
या समस्येला स्त्री किंवा पुरुष किंवा दोघेही कारणीभूत असू शकतात. म्हणूनच स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यताप्राप्त लॅबमध्ये होणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्या वैद्यकीय रिपोर्टच्या आधारे व्यक्तिगणिक उपचारांची रूपरेषा तज्ज्ञ डॉक्टर ठरवू शकतात.
आज रविवार दि.12 मे रोजी होणाऱ्या शिबिरास गरजू जोडप्यांनी प्रत्यक्षात येऊन लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज