मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात त्यांच्या रुग्णालयातील महिलेवर गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र, या आरोपी महिलेच्या वकिलाने मोठा खुलासा केला आहे.
आरोपी मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वकील प्रशांत म्हणाले, ‘१७ तारखेला आरोपी महिलेने एक मेल डॉ. शिरीष वळसंगकर यांना केला होता.
त्यामध्ये महिलेने असे सांगितले होते की, माझी पगार कपात केली जात आहे. काही व्यक्तींचा ऐकून त्याच्यावर आरोप केले जातात. अधिकार कमी केले जात आहेत. या संदर्भात तिने तक्रार केली होती’.
‘या मेलच्या अनुषंगाने डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी तिला बोलावून घेतलं होतं. त्यावेळी महिलेने मेल करून चूक झाल्याची कबुली दिली. त्यावेळी माफी देखील मागितली होती. त्यानंतर डॉक्टरांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे एफआयआरमध्ये नोंद आहे. महिला एवढी त्रास देणारी होती तर निश्चितच त्याच दिवशी तिला बोलावण्यात देखील आलं नसतं, असे वकील प्रशांत यांनी म्हटलं.
‘डॉक्टरांची चिठ्ठी जप्त झाली आहे. त्यातील हस्ताक्षर नमुने घेऊन तपासाला पाठवायचे आहेत, असं मत पोलिसांनी कोर्टासमोर मांडले. प्रख्यात मेंदूरोग तज्ज्ञ असणारे डॉक्टर या कारणामुळे आत्महत्या करणे शक्य नाही.
या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून ते बाहेर येऊ नये यासाठी खोटी केस मनीषा माने यांच्यावर करण्यात आली आहे असा युक्तिवाद आम्ही मांडला आहे, असे वकिलांनी सांगितलं.
‘दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. जेव्हा कोठडी संपेल, तेव्हा आम्ही जामीनासाठी अर्ज करू. मनीषा माने यांच्यावर एकही गैरव्यवहाराचा आरोप नाही.
आरोप एवढाच आहे की, त्यांनी डॉक्टरांना मेल केला. त्यात त्यांनी डॉक्टरांवर आरोप केले की माझा पगार कपात करू नका. मी फार जुनी कर्मचारी आहे. एक दिवसाचा पगार कपात केला एवढाच विषय आहे, असे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज