टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्तसाठा संपला असून उजनी धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीसाठा मृतसंचयाखाली गेला आहे. काल गुरुवारी दुपारी उजनी धरणातील पाणीसाठा प्लसमधून मायनसमध्ये गेला.
परिणामी, सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणी योजना पूर्ण बंद होणार आहेत. पुढे पावसाळ्यात धरणात पाणी आल्यानंतर या योजना पुन्हा सुरू होऊ शकतील.
दरम्यान 2020 मध्येही मे महिन्याच्या 13 तारखेलाच उजनीचा पाणीसाठा प्लसमधून मायनस गेला होता. दोन वर्षांपूर्वी 15 मे 2019 रोजी उजनी धरण उणे 38 टक्के होते.
पाणीसाठा 43.16 टीएमसी होता. त्या तुलनेत गेली दोन वर्षे धरणात मे महिन्याच्या मध्यावर अचल पाणीसाठा 63 टीएमसी आहे. पावसाळा सुरू होईल इतपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नाही.
तरीही सध्या मुख्य कालव्यातून 3 हजार 150 क्युसेक, तर सीना-माढा 296, दहिगाव उपसासिंचन 85 क्युसेकने विसर्ग धरणातून चालू आहे. त्यामुळे पावसाळा चालू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उजनी धरणाच्या 123 टीएमसी पाणी साठ्यापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त, तर 63 टीएमसी हा मृतसाठा धरला जातो, तर 6 टीएमसी इतके अतिरिक्त पाणी आहे.
कारण उजनी धरण 100 टक्के भरते त्यावेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111 टक्के पाणी साठवले जाते. त्यावेळी पाणीसाठा 123 टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील 63 टीएमसी पाणी संपले आहे.
उजनी धरणातील पाण्यावर किमान 45 साखर कारखाने व दहा औद्योगिक वसाहती चालतात. सोलापूर शहरासह शेकडो गावांचा पाणीपुरवठा याच धरणाद्वारे होतो. हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोयही होते.
यामुळे उजनी धरणाला राजकीय आर्थिक व सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून असते.
भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागल्याने लवकरच नदीत पाणी सोडावे लागणार आहे. नदीत पाणी सोडण्यास सुरुवात होईपर्यंत धरण मायनसमध्ये गेलेले असेल. त्यात सध्यस्थितीत उजनी कालवा, बोगदा, सीना-माढा जलसिंचन योजनेत पाणी सोडले जात आहे.
धरणकाठचे उपसासिंचन, बाष्पीभवन आदी कारणांमुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने खालावणार हे नक्की. भीमा नदीत मेमध्येच पाणी सोडणार असल्याचे उजनी अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज