मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच आठ वर्षाच्या मुलीला आपल्या शेतातील वस्तीसमोरच पुरल्याचा प्रकार काल शुक्रवारी दुपारी उघडकीस आला.
दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही, हे शवविच्छेदन झाल्यानंतर कळणार आहे. दरम्यान मंद्रूप पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे.

श्रावणी ओगसिद्ध कोटे (वय ८) असे मृत मुलीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली. त्यांनी ही माहिती मंद्रूप पोलिसांना दिली.
सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. वस्तीवर जाऊन पाहणी केली. मुलीचे वडील ओगसिध्द रेवणसिध्द कोटे याला विचारले. तेव्हा त्यांनी मुलीला फिट येत असल्याने ती मृत झाली.

त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली
खड्ड्यात पुरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला
गुरुवारी रात्री दहानंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे. शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषभ कांबळे, पंचाच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला. तेव्हा मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश होता.

अंगाला पावसामुळे माती चिकटलेली होती. नातेवाईकांनी ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला.
मुलीचा गळा दाबून खून केल्याची चर्चा
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजणार मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. उद्या शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुलीचा मृत्यू नेमके कशामुळे झाला ? हे समजणार आहे. दरम्यान आज कुसूर गावात वडिलांनीच सदर मुलीचा गळा दाबून खून केल्याची चर्चा होती. त्यामुळे वस्तीजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

आई रुग्णालयात, मुलीच्या निधनाबद्दल अनभिज्ञ
ओगसिद्ध कोटे व वनिता यांची श्रावणी ही दोन नंबरची मुलगी. त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्य. ओगसिध्द हा भांडखोर असल्याने मुलांना घेऊन वनिता कुसूर येथील माहेरी सहा महिन्यापासून राहत होती.

दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या रुग्णालयात तिच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली. ती रुग्णालयातच आहे. पतीने पोटच्या मुलीला पुरल्याची तिला माहिती देण्यात आली नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










